गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जानेवारी 2015 (17:50 IST)

आराध्याला आहे मेकअपची माहिती

गवयाचे पोरही सुरात रडते, असे म्हटले जाते. बॉलिवूडमधील नावाजलेल्या कलाकारांच्या कुटुंबात जन्मलेली आराध्या बच्चनममध्येही   अभिनकलेविषयी उपजतच ज्ञान असावे, असे म्हटले तरी चालेल. खुद्द तिची आई ऐर्श्वयाला नुकताच याबाबतचा एक अनुभव आला. त्यामुळे ती स्वत: थक्क होऊन गेली. याबाबत ऐश्वर्याने सांगितले, मागील काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये आराध्या माझ्या आणि अभिषेकसोबत आली होती. तिथून परत आल्यानंतर मी मेकअप काढत होते. आराध्या माझ्याकडे आली आणि विचारायला लागली, तू काय करत आहेस? मी म्हटले चेहरा स्वच्छ करते. ती लगेच म्हणाली, नाही तू तुझा मेकअप काढते. हे ऐकून मला आनंद झाला. माझी मुलगी मेकअपचा 
 
अर्थ समजू लागली आहे. ती मोठी होत आहे. मात्र मी तिला यापासून दूरच ठेवले आहे.