गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आलियासोबतच्या अफेअरवर सिद्धार्थने अखेर मौन सोडलं

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरबाबत बॉलिवूडमध्ये अनेक चर्चा सुरु आहेत. सिद्धार्थने याबाबत अखेर मौन सोडलं आहे. 
 
आलिया माझी चांगली मैत्रीण आहे आणि आमच्यात भावनिक नातंही बनलं आहे. स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमापासून आम्ही दोघांनीही बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात केली. या सिनेमापासूनच आमच्यात एकप्रकारे भावनिक नातं बनलं आहे. शिवाय, या सिनेमाच्या आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखत होतो, असेही सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला. 
 
आलियासोबतच्या अफेअरबाबत दोघांच्या कुटुंबीयांमध्ये काय चर्चा असते, असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. त्यावेळी सिद्धार्थ म्हणाला, अशा उलट-सुलट चर्चाची आता कुटुंबीयांनाही सवय झाली आहे.