शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2015 (10:56 IST)

ऋषी कपूर म्हणाले 80 किलोची हिरोइन

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ऋषी कपूर यांच्या ‘80 किलोची हिरोइन’ या टि्वटरला उत्तर दिले आहे. सोनाक्षीच्या मते, हे टि्वट ऋषी कपूर यांच्या डोक्यातून आलेली कल्पना नाहीये. एका मुलाखतीत तिने सांगितले, ‘मला विश्वास आहे, की हे टि्वट ऋषी कपूर यांच्या डोक्यातील कल्पना नाहीये. पूर्वीपासूनच हे टि्वट फिरत असेल. त्यांना फनी वाटले म्हणून त्यांनी ते शेअर केले. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. याला सकारात्मक घेणेच चांगले आहे. 
 
‘मागील दिवसांत ऋषी कपूर यांनी टि्वटरवर एक जोक पोस्ट केला होता. त्यामध्ये आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हाचे नाव सामील होते. ऋषी यांच्या या पोस्टमध्ये ‘आलिया एका वर्तमानपत्रात वाचते, 80 किलोची हिरोइन पकडली गेली. यावर आलियाची प्रतिक्रिया अशी, शिट! सोनाक्षीला का पकडले.’ या टि्वटरवर आलिया आणि सोनाक्षीच्या चाहत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळी ऋषी यांना याला गंभीररीत्या न घेता हा केवळ विनोद असल्याचे सांगितले होते.