गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

करीना आणि सैफचे रॉयल रिसेप्शन (फोटो)

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नाचे रिसेप्शन शाही अंदाजात 'पतौडी पॅलेस'मध्ये आयोजण्यात आले, ज्यात बॉलीवूड, उद्योग, राजकारण आणि खेळ जगताशी संबंध ठेवणार्‍या मोठं मोठ्या लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली.

WD


या प्रसंगी शाहरुख खाआपली पत्नी गौरीसोबत आला. या शिवाय रिसेप्शन (दावत-ए-वलीमा)मध्ये पंतप्रधानांची पत्नी गुरशरण कौर, शीला दीक्षित, कमलनाथ, मोंटेक सिंह अहलूवालिया, फारुख अब्दुल्ला, अरुण जेटली, सीताराम येचुरी, गीतकार प्रसून जोशी आणि अभिनेत्री नंदिता दास सर्वात अगोदर पोहोचलेल्या पाहुण्यांमध्ये सामील होते.

WD

समारंभाची थीम मोगर्‍याच्या फुलांसोबत क्रीम आणि सोनेरी रंगाची होती. गौरी खानने फारच सुंदर घागरा-ओढणी परिधान केले असून पार्टीच्या आकर्षणाची केंद्रबिंदू होती.

WD

समारंभासाठी करीनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता, तसेच या प्रसंगी सैफने राघवेंद्र राठोडचा डिझायनर परिधान केला होता.

WD

करीनाची मोठी बहीण करिश्माप आपल्या बहिणीने संसारीक जीवनात पर्दापण केल्याने फारच खूश झाली असून तिने थीमप्रमाणे पांढरा आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता.

WD

भारताचे मॅन ऑफ स्टील रतन टाटा स्वतः: कार चालवून वर-वधूस आशीर्वाद द्यायला पोहोचले.

WD