शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: पॅरीस , बुधवार, 2 जुलै 2014 (14:50 IST)

किंग खान शाहरूखला सर्वोच्च नागरी पुरस्कार

बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानला फ्रान्सच्या 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले  आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेन्ट फेबियस यांच्या हस्ते एका समारंभात शाहरुखला हा पुरस्कार देण्यात आला. 

शाहरुख म्हणाला, 'आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ती जिवंत असती तर मला पुरस्कार मिळाल्याचा तिला खूप आनंद झाला असता. मी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी आभारी आहे.'