मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 30 मे 2011 (15:28 IST)

जॉनमुळे चित्रागंदाच्या वैवाहिक जीवनात तुफान!

IFM
चित्रपट अभिनेत्री चित्रांगदाची जॉन अब्राहमशी वाढलेल्या मैत्रीमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात तूफान निर्माण झाला आहे. चर्चा आहे की चित्रांगदाचे पती गोल्फर ज्योती रंधावाला तिने जॉनशी केलेली मैत्री बिलकुल पटत नाही आहे.

दोघांमध्ये यामुळे मागील एक महिन्यापासून रोज वाद विवाद होत आहे. चित्रांगदा सद्या जॉनसोबत चित्रपट 'देसी ब्वायज' मध्ये काम करीत आहे आणि त्यांच्यात जवळकी वाढत आहे.

दोघांना रात्री उशीरापर्यंत डिनर करताना बघण्यात येत आहे आणि ज्योतीला हे बिलकुल पटत नसून तो चित्रांगदाला घेऊन जॉनवर शंका घेत आहे.

चर्चा तर अशी आहे की जॉन चित्रांगदाशी लग्न करण्याचा विचार करत आहे आणि जोपर्यंत ती ज्योतीशी घटस्फोट घेत नाही तोपर्यंत ते दोघेही लिव इन रिलेशनशिप राहत असून घटस्फोट झाल्यानंतर ते दोघेही लग्न करणार आहेत.

ऐकण्यात असे आले आहे की जॉन आणि बिपाशाच्या ब्रेकअपचे कारणच चित्रांगदा आहे.