शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

प्रियंकाची 'डोकॅलिटी'

IFMIFM
एखादा चित्रपट करायचा नसला की काही तरी कारणे सांगावी लागतात. काही जण थेट नकार देतात. काही कथेत, पटकथेत दोष काढतात. काही जण डेट्स नसल्याची कारणे सांगतात. पण प्रियंका चोप्रा यांच्यापेक्षा हुषारेय. ती थेट नकार देत नाही. अव्वाच्या सव्वा पैसे वाढवून मागते. निर्मात्याने ती मागणी मान्य केली तर काय मजबूत आर्थिक फायदा होतो. निर्मात्याची तेवढी तयारी नसली की 'फुटासची गोळी' घेतो. दोन्ही बाजूंनी फायदा प्रियंकाचाच होतो.

नुकतीच प्रियंकाने संजय गढवीच्या 'सेव्हन डेज इन पॅरीस'ला नकार दिला. यात इमरान खान नायक आहे. आमीरप्रमाणेच त्यानेही पटकथेत बरेच फेरफार केले. त्यामुळे कतरीना कैफ चित्रपट सोडून गेली. मग संजय प्रियंकाकडे गेला. तिने नकार न देता त्याच्याकडे पाच कोटी मागितले. संजय हिरमुसला होऊन तिथून निघून गेला. वास्तविक या चित्रपटात नायिकेला काही काम नाही. मग थेट नकार देण्यापेक्षा पैसे जास्त मागितलेले बरे. प्रियंकाच्या 'डोकॅलिटी'चे कौतुकच करायला पाहिजे.