मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 30 मे 2011 (11:03 IST)

भन्साळी हे संगीताचा विश्वकोश- श्रेया घोषाल

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे संगीताचा विश्वकोश असल्याचे मत आघाडीची गायिका श्रेया घोषाल हिने व्यक्त केले. श्रेया, भन्साली व गायक सोनू निगम 'एक्स-फॅक्टर' या संगीतावर आधारित रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यानिमित्ताने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना श्रेया म्हणाली, की 'गुझारिश'चे पूर्ण संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

आपल्याला वाटते, की कुठेतरी संगीत त्यांना चित्रपटांसाठी प्रेरणा देते. आपल्यासाठी ते चांगल्या संगीताचा विश्वकोश आहेत. त्यांनी एवढे काही ऐकले आहे, ते केवळ भन्नाट आहेत. संजयजी व सोनू यांच्याबरोबर परीक्षणाचे काम करण्यामुळे ते अधिकच खास बनते, कारण या दोघांशीही जोडली गेलेली विश्वासार्हता व संगीताची व्यापकता जोडली गेलेली आहे. सध्याच्या संगीतविश्वाचे ते शिखर आहेत, असेही श्रेयाने म्हटले.