शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

भाचा चालतोय मामाची वाट

IFMIFM
'जाने तू या जाने ना' हा चित्रपट बनवता बनवता मामा आमीर खानने इमरान खान या आपल्या भाच्याला बरेच काही शिकवले आहे. करीयर सुरू झाल्यानंतर ज्या गोष्टी आमीरला बर्‍याच उशीरा कळल्या, त्या आमीरने भाच्याला आत्ताच सांगून टाकल्यात. मोजकेच सिनेमे करायचे हा सल्ला त्यातलाच एक. आमीर अनेकदा चित्रपट नसेल तर रिकामा बसतो, पण फालतू चित्रपट करत नाही. त्यामुळेच तो वर्षभर चर्चेत रहातो.

इमरानने मामाचा हा सल्ला भलताच मनावर घेतलाय. 'जाने तू या जाने ना' नंतर इमरानला साईन करण्यासाठी बड्या बॅनर्सची लाईन लागली होती. दुसरा कुणी असता तर हा पैसा सोडला नसता. शिवाय काम मिळेल नाही मिळेल हे बॉलीवूडमध्ये सांगता येते काय. कारण प्रत्येक शुक्रवारी नवा प्रतिस्पर्धी निर्माण होत असतो. पण इमरानला त्याची भीती नाही. चित्रपटांच्या निवडीबाबत तो अतिशय सिलेक्टिव्ह आहे. सध्या तो दोन ते तीनच चित्रपट करतोय.

सुरवातीला इमरानला साईन करण्यापूर्वी आमीरला स्क्रिप्ट ऐकवायला लागेल, अशी वदंता होती. पण आमीरनेच इमरान प्रौढ आहे, चांगेल काय वाईट काय हेही त्याला कळते असे सांगून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.