बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 29 जून 2010 (10:54 IST)

मनीषा लांबा साऊथ चित्रपटात दिसणार

मनीषा लांबा सुंदर आणि सेक्सी असली तरी बॉलीवूडमध्ये तिला फारसे काम मिळत नसल्याने आता तिने साऊथ इंडियन चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या वेल्डन अब्बामध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले असले तरी यानंतर बॉलीवूडमध्ये तिला काम मिळाले नसल्याने ति नाराज आहे.

बॉलीवूड निर्मार्त्यांकडे चकरा मारून थकल्यावर आता तिने साऊथ इंडियन चित्रपटात आपले नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे.