शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

मुग्धा गोडसेची कमाल

IFM
मुग्धा गोडसेची बाकी कमाल आहे. मुंबई-पुणे मार्गावर काही दिवसांपूर्वीच तिला अपघात झाला. त्यात तिच्या मानेला मार बसला आहे. हे दुखणे अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही. तरीही ती शुटींगमध्ये भाग घेतेय. निर्मात्यांनी आपल्यावर पैसा लावला आहे आणि त्यांचे नुकसान व्हायला नको, म्हणून मुग्धाने हे पाऊल उचलले आहे. अजय देवगणच्या 'ऑल दी बेस्ट' आणि मधुर भांडारकरच्या 'जेल'मध्ये ती आहे.

जेलमध्ये फक्त संवाद म्हणायचे होते, त्यामुळे त्याच्या शुटींगमध्ये अडचण आली नाही. पण 'ऑल दी बेस्ट'मध्ये तिला नाचायचेही होते. त्यासाठी तिला सोप्या स्टेप्स दिल्या जाणार होत्या. पण मुग्धाने आधी ठरवलेल्या स्टेप्स करायचे ठरविले. त्यासाठी डान्सच्या मधल्या काळात मानेला बॅंड बांधून काळजी घेतली. पण तो डान्स पूर्ण केला. कमाल आहे की नाही मुग्धाची?