शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

रजनीकन्या ऐश्वर्या-धनुष जोडीत बेबनाव

WD
'कोलावरी डक्ष' या गाण्याने यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केल्यानंतर दक्षिणेचा महानायक रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आर धनुषच्या '3'या पदार्पणातील चित्रपटानेही मोठे यश मिळविल्यानंतरही या पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे आणि त्याला कारण आहे दक्षिणेचा दुसरा महानायक कलम हसनची मुलगी श्रृती हसन.

धनुष आणि श्रृतीच्या वाढत्या जवळिकीमुळे ऐश्वर्या आणि आर धनुषच्या नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे या दोघांत विसंवाद निर्माण झाल्याच्या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. धनुष, श्रृती आणि अनिरुद्ध एका रेडिओ चॅट शोमध्ये सहभागी झाले असताना ऐश्वर्या आल्यानंतर आपले डोके दुखत असल्याच्या कारणावरून धनुषने तिथून काढता पाय घेतला.