शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनीने विकत घेतला क्रिकेट संघ

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने टीव्ही कलाकारांचा क्रिकेट संघ विकत घेत या संघाची ती मालकीण बनली आहे. सर्व भारतीय हे क्रिकेट मनापासून पाहातात आणि मला देखील लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची ओढ होती. त्यामुळे मी आता टीव्ही कलाकारांचा क्रिकेटचा संघ विकत घेतल्याने पुन्हा क्रिकेटशी जोडली जाणार आहे. माझ्या वडिलांनादेखील क्रिकेट खूप आवडायचे आणि मी क्रिकेटविषयी त्यांच्याकडून खूप ऐकल्याचे सनीने सांगितले. चेन्नई स्वॅगर्स हा संघ सनी लिओनने विकत घेतला आहे. ज्यामध्ये टीव्ही कलाकार त्विक धजनानी, मौनी रॉय आणि संग्राम सिंग यांचा समावेश आहे. क्रिकेटविषयी मला जास्त कळत नाही, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मला खूप आवडतो, असे सनी लिओनने म्हटले आहे. लवकरच बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूरने सुरू केलेल्या बॉक्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये आता सनी लिओनचा चेन्नई स्वॅगर्स हा संघही सहभागी होणार आहे.