शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानने बॉडीगार्डकडून घेतले उधार

सुपरस्टार असून सलमान खानला बॉडीगार्डकडून पैसे उधार मागावे लागले. सलमानचा प्रत्येक चित्रपटाने कोटीं रुपयांचा गल्ला गोळा होतो तरी त्याला उधारी का करावी लागली?
 
कारण सलमान खानला ऐनवेळी गरीब मुलांची मदत करावीशी वाटली. सलमान आपल्या मित्रांसोबत बांद्रा येथील ऑलिव रेस्टॉरन्टमध्ये गेला होता. येथून पहाटे 4:30 वाजता निघताना त्याच्या दृष्टीस चार गरीब मुलं पडली. मुलांना बघताक्षणी सलमान विरघळा आणि त्यांना काही आर्थिक मदत करू पाहत होता.
 
पण क्रेडिट कार्ड केरी करणार्‍या सलमानकडे कॅश नव्हती. अशात त्याला आपल्या बॉडीगार्डकडून मदत घ्यावी लागली. बॉडीगार्डकडून पैसे घेऊन सलमानने त्या मुलांना 500-500 रुपये दिले. आणि मुलं सलमानला पाहून जाम खूश झाले.
 
असे ऐकण्यात आहे की ऋषि कपूर सुद्धा ऑलिव येथे येत असतात आणि रेस्टॉरन्टच्या बाहेर उभे असलेल्या मुलांना मदत करतात.