गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2015 (10:09 IST)

सुशांत करणार चित्रपट निर्मिती

मला आशा आहे, मी लवकरच निर्मिती क्षेत्रात येईन, नुकताच याबाबत मी विचार केला आहे. बघू कसं होतं ते. अभिनयाकडून निर्मिती क्षेत्राकडे वळू पाहाणार्‍या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्क्षी अर्थात सुशांत सिंहचे हे उद्गार आहेत. याचं कारण सुशांतला विचारलं तर उत्तर काही असं आलं, अभिनेता म्हणून मी किती कमावतो, याबाबत अद्याप मी काही विचार केलेला नाही. पण मागील काही दिवसात मी खूप काही शिकलो आहे. या सगळ्यांमुळे माझ्यात बदलही झाला आहे. चार चित्रपट केल्यानंतर मला समजलं आहे की, आपल्या चित्रपटाची मार्केटिंग करणं किती गरजेचं आहे ते, पण मी जेव्हा निर्माता बनेन तेव्हा या सगळ्या अनुभवांचा वापर करणार आहे. सुशांत असंही म्हणतो की, मी जेव्हा केव्हा चित्रपटनिर्मिती करेन तेव्हा ती बॉलीवूड फॉर्म्युल्यापेक्षा वेगळी असेल.

टीव्हीसाठी काही नवीन आणाला मला आवडेल. डिजीटल मीडियाबाबतही सुशांतच्या योजना आहेत. पण निर्मितीबाबत मूळ योजना बनवलनंतरच स्क्रिप्टचा शोध घेणार असल्याच सुशांत सांगतो. सुशांतची ही निर्मिती ‘पीके’ची सहअभिनेत्री अनुष्का शर्मा (एनएच10) सारखी असणार का? असं विचारलं असता सुशांत सांगतो, मला एनएच 10 पसंत आला. पण मीसुद्धा सामाजिक मुद्दे उठवलेत पाहिजे, असं गरजेचं नाही. कदाचित माझे चित्रपट कमर्शिअलसुद्धा असू शकतील. पण ते अगदी मर्ख बनविणारेही नसतील. असो दुसरीकडे ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये भूमिका करणारा नील नितीन मुकेशही निर्माता बनण्याच्या तयारीत आहे.