गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (17:25 IST)

सोनमची स्तुती

आता निर्माता सूरज बडजात्याला अभिनेत्री सोनम कपूरच्या अभिनय आणि सौंदर्याने भुरळ घातली असून सोनम राजश्री प्रोडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात सलमान खान हा तिचा हिरो आहे. सोनम ही एक जबरदस्त अभिनेत्री आहे. वेगळे काही करून दाखविण्याची तिची नेहमी इच्छा असते. माझ्या चित्रपटासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टी तिच्यात असून तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. सोनमही टिपिकल भारतीय अभिनेत्री असून, तिच्यासोबत पहिल्यांदा काम करीत आहे असे कदापि वाटत नाही, अशा शब्दात सूरज बडजात्याने सोनमवर स्तुतिसुमने उधळली आहेत.