शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2015 (10:12 IST)

‘लीला’ सारखीचं सलमानची ’शुद्धी’

बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्रीला पडद्यावर पाहायला येतात, जिच्या नावावर सिनेमा चालतो, ती सनी लिऑन, तसंच सलमानच्याही बाबतीत आहे, सलमानलाही सिनेमाच्या पडद्यावर पाहायला येतात आणि सलमानच्या नावावर सिनेमा चालतो. मात्र सलमान आणि सनी यांच्यात एक पेचप्रसंग उभा राहिला आहे.

सलमान खानचा शुद्धी हा सिनेमा येणार आहे, त्या आधी सनी लिऑनचा ‘एक पहेली लीला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘एक पहेली लीला’ जेव्हा सलमान खानच्या ‘शुद्धी’ चित्रपटाच निर्मात्यांनी पाहिला तेव्हा त्यांच्यावर शुद्ध हरपण्याची वेळ आली होती, कारण ‘एक पहेली लीला’ आणि ‘शुद्धी’ या सिनेमाची स्टोरी मिळती-जुळती होती. या दोन्ही सिनेमांचं कथानक हे पुनर्जन्मावर आधारित आहे. यामुळे ‘शुद्धी’ चित्रपटाचं संपूर्ण कथानक बदलण्याचं मोठं आव्हान आता निर्मात्यासमोर उभं ठाकलं आहे.