शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By वेबदुनिया|

बुध्दाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील

नेपाळमधील गौतम बुध्दाच्या जन्मस्थानावर पुरातत्त्व खात्याने शोधून काढलेल्या सर्वात जुन्यमंदिरामुळे बुध्दाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील असण्याबाबत पुष्टी मिळत आहे. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून प्रसिध्द केलेल्या पवित्र मायादेवी मंदिराच्या परिसरात लुंबिनी येथे खोदकाम करण्यात आले.

या खोदकामात ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील बांबूचा ढाचा आणि विटांमध्ये बांधलेली अनेक मंदिरे सापडली आहेत. ब्रिटनच्या डरहॅम विद्यापीठातील संशोधकांचे पथक रॉबिन कॉनींगहम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून बुध्दाच्या जीवनकाळातील सापडलेला हा पहिलाचा पुरातत्त्व मंदिराचा भाग असल्याचे सांगणत आले. बांबूच्या ढाच्यात मध्यभागी खुली जागा असून राणी मायादेवीने झाडाची फांदी हातात धरून लुंबिनी गार्डनमध्ये आपल्याला जन्म दिल्याची कथा बुध्दाने स्वत:च लिहून ठेवली आहे. भू-पुराणवस्तू संशोधकांनी या भागात पुरातन वृक्षाची मुळे असल्याचे म्हटले आहे.

लुंबिनी परिसरात यापूर्वी झालेल्या खोदकामात ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकापर्यंत अवशेष मिळाले होते. महाराजा अशोकने याच काळात सध्याच्या अफगाणिस्तानपासून बांगलादेशर्पत बौध्द धर्माचा प्रसार केल्याचे मानले जाते. बुध्दांच्या जन्मतारखेबाबत इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात बुध्दांनी त्यांच्या विचारांचा प्रसार केला. वयाच्या 80 व्या वर्षी बुध्दांचा अंत झाल्याचे मानले जाते. आता नव्या संशोधनामुळे लुंबिनीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.