गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : गुरूवार, 9 एप्रिल 2015 (13:15 IST)

इंटर्नशिपसाठी करा ऑनलाईन अप्लाय

सुट्या लागल्या असल्या तरी कॉलेजिअन्स वेगळ्याचं धडपडीत असतात. करिअरसाठी मेहनत घेणारे तरुण इंटर्नशिप मिळवण्यासाठी भरसक प्रयत्न करतात. काही जॉब पोर्टल्सवर सीव्ही अपलोड करतात तर काही आपल्याचं शहरात लहान-सहान कंपनीत अप्लाय करू पाहतात. सध्या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जॉब शोधणंही सोपं झाले आहे. साईटवारी काही ग्रुप्स विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्ससाठी मदतदेखील करतात.

असे शोधा ग्रुप्स
आपल्या विषयाशी संबंधित किंवा आपण करू इच्छित असलेल्या क्षेत्राचे उल्लेख करून फेसबुकवर सर्च करा. याव्यतिरिक्त आपल्याला कुठल्या शहरात इंटर्नशिप करायची आहे ते ही टाकून सर्च करा. जसे जॉब्स इन चेन्नई, जॉब्स इन दिल्ली किंवा जॉब्स इन मुंबई वगैरे. हे कीवर्ड टाकल्यावर आपल्याला त्या नावाने अनेक ग्रुप्स सापडतील. याशिवाय आपणं अनेक फिल्टर्स लावून हवा तसा आणि हवा त्या शहरातला ग्रुप्स शोधू शकता.
या ग्रुप्सची काम करण्याची पद्धत
अधिकांश सोशल नेटवर्किंग ग्रुप्समध्ये ऑनलाईन फोरम असतं ज्यात नियोक्ता आणि नोकरी हवी असणारे सामील असतात. एखाद्या कंपनीत एखादी जागा रिकामी असल्यास त्या संदर्भातली माहिती ग्रुपवर पोस्ट करण्यात येते. त्याबरोबरचं संपर्क क्रमांक, त्यांची गरज, आणि अधिक माहितीसाठी लिंक वगैरे पोस्ट केली जाते. यामाध्यमातून अगदी दोन-तीन महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंतची इंटर्नशिप मिळू शकते. इथे सक्रिय असलेले लोकं नोकरी हवीय किंवा देयची आहे अश्या पोस्टखाली या संदर्भातल्या पोस्ट टाकतात. त्याने लगेगच प्रतिसाद मिळतो.
अप्लाय करताना काळजी घ्या
हा ओपन प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपली पर्सनल माहिती पाठवण्याआधी सर्तक राहणं गरजेचं आहे:
कंपनी कोणती आहे, किती वर्ष जुनी आहे, प्रतिष्ठित आहे वा नाही, हे तपासून घ्या
शक्य असल्यास कंपनीशी लैंडलाइनवरून संपर्क साधा
आपणं योग्य असला तरी समोरच्यावर लगेच विश्वास ठेवू नका
नोकरीसाठी पैसे भरण्याची मागणी केल्यास पैसे भरणे टाळा
आपल्या संदर्भात नसलेल्या क्षेत्रांसाठी पोस्ट टाकू नका. याने आपला वेळही जाईल आणि काही प्रॉब्लेम झाल्यास आपण अडचणीत येऊ शकता
कंपनीचं ठिकाण, तिथली माणसं, कामाचं स्वरूप, शिफ्ट्स, पगार यासारख्या गोष्टी स्पष्ट असल्यावरचं पुढे पाऊल टाका
ऑनलाईन माहिती देताना सावध राहा, मनात काहीही शंका असल्यास त्यातून निवृत्त होऊनच माहिती शेअर करा
इंटरव्यूसाठी हॉटेल, बाग, कॉफी शॉप, मॉल वगैरे ठिकाणी जाऊ नका. आणि जावचं लागले तर एकटं न जाता विश्वासू माणसाला बरोबर घेऊन जा