शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

सैन्यदल आव्हानात्मक करियर

ND
तुम्हाला नवनवीन आव्हान स्वीकारण्यास आवडते का? तुम्हाला साहस, धैर्य आवडतात का? शिस्तीचे जीवन तुम्हाला आकर्षित करते का? या सारख्या प्रश्नांची उत्तर हो असतील तर भारतीय सेना तुमच्यासाठी उत्तम करियर ठरू शकते. देशाची सेवा करण्याची संधी आणि 'चॅलेंज लाईफ' या दोन्ही बाबी या करियरमधून तुमच्या साध्य होवू शकतात.

भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) प्रवेश परीक्षा घेतली जाते. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही या तिन्ही दलात भारतीसाठी दोन प्रकारची परीक्षा होते. बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) प्रवेश घेऊन सैन्यदलात अधिकारी होता येते. एनडीएत प्रवेशासाठी युपीएससीतर्फे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. बारावी उत्तीर्ण किंवा परीक्षा दिलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतात. यासंदर्भात विस्तृत माहिती एप्लामेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये प्रसिद्ध केली जाते. एनडीएत प्रवेश मिळाल्यानंतर पदवीबरोबर सैन्यात अधिकारी अशी दुहेरी संधी मिळते. तीन वर्ष एनडीएत आणि एक वर्ष आयएमएमध्ये शिक्षणानंतर सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते.

बारावीनंतर सैन्यात जाण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात जाण्याची आणखी एक संधी संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएस) मार्फत उपलब्ध होते. युपीएससीतर्फे ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. त्यासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा परीक्षेला बसलेले विद्यार्थी पात्र ठरतात. यासंदर्भात विस्तृत माहिती एप्लामेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये प्रसिद्ध केली जाते. तसेच जिल्हा स्तरावर असलेल्या जिल्हा सैनिक कार्यालयातूनही सैन्यदलातील भरतीबाबत माहिती मिळू शकते.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) मार्फत सैन्यदलात सरळ प्रवेश मिळू शकतो. तसेच अभियांत्रिकी शाखेच्या तरुणांनाही सैन्यदलात संधी आहे.