बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (09:16 IST)

अमित ठाकरे आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला, केल्या काही सूचना

राज्यातील आरोग्य सेवेविषयी असलेल्या प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. या सूचनावर लवकर कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठाकरे यांना दिलं.
अमित ठाकरे यांनी केलेल्या सूचना…
१) करोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी, यासाठी एक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन विकसित करावं.
२) बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांची वेतन कपात रद्द करून त्यांचा पगार पूर्ववत करावा.
३) प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यायलाच हवी.
४) प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत व त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.