बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (15:24 IST)

महाराष्ट्र सायबरकडून ४०७ गुन्हे दाखल, २१४ जणांना अटक

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर देशपातळीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून खोटी माहिती व आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जात आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल करडी नजर ठेऊन आहे. 
 
सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह वॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर प्रकरणी १६२, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १९, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७, इन्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ४, तर, अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात सायबर पोलिसांना यश आहे.