मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

Last Modified सोमवार, 6 एप्रिल 2020 (17:43 IST)
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. भारतीय नता पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्यावर सध्या मोठं संकट आलं आहे. तरीही आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. भारत हा विकसनशील देश आहे. आपण एकीकडे गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशीही लढत आहोत. तर दुसरीकडे करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या प्रयत्नांची सर्व राष्ट्रांनी, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे. करोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक उत्तम उदाहरण दिलं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

करोनाविरुद्धच्या लढ्यात भारतानं जे नियोजन केलं आहे, त्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं आहे. या लढ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना नमन. रविवारी दिवे लावण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनालाही मोठा प्रतिसाद देत जनतेनं सहभाग घेतला. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. करोनाची लढाई ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचं आहे. लढून पुढे जायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
मोदींनी सांगितलेले पाच संकल्प
१. गरिबांच्या राशनसाठी अविरत सेवा अभियान.
२. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या.
३. धन्यवाद अभियान राबवा.
४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा.
५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

मराठी माणसा, भिऊ नकोस "मी" तुझ्या पाठीशी आहे...

मराठी माणसा, भिऊ नकोस
आपण जवळ जवळ दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलो आहोत. गेली दोन महिने आपण आपल्या ...

नागपूर जगातील सर्वांत उष्ण शहरांत आठवा क्रमांकावर

नागपूर जगातील सर्वांत उष्ण शहरांत आठवा क्रमांकावर
नागपूर जगातील आठवे उष्ण शहर आहे. सोमवारपासून नवतपा सुरू झाला आहे. यामुळे पारा आणखी ...

करोनाबाधितांच्या संख्येत धारावी, माहिम, दादरमध्ये वाढ

करोनाबाधितांच्या संख्येत धारावी, माहिम, दादरमध्ये वाढ
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी देणगी जमा
या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा ...

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले
जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे. ...