शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

स्त्रीआत्मसंघर्षाची कहानी 'लागा चुनरी मे दाग'

निर्माता : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
संगीत : शंतनू मोइत्रा
कलाकार : राणी मुखर्जी, कोंकणा सेन शर्मा, अभिषेक बच्चन, कुणाल कपूर, जया बच्चन, अनुपम खेर

IFMIFM
पदापर्णातच 'परिणिता' सारखा दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रदीप सरकार आता 'लागा चुनरी मे दाग' हा स्त्रीप्रधान कथा असणारा चित्रपट घेऊन येत आहेत. परिणिता चांगला जमल्यामुळे लागा चुनरी मे दाग कडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत.

या चित्रपटाची कथा साधारणपणे अशी आहे. वाराणसी येथे वास्तव्य असणारे शिवशंकर सहा्य (अनुपम खेर) सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. पत्नी सावित्री (जया बच्चन) व बडकी (रानी मुखर्जी) व छुटकी (कोंकणा सेन शर्मा) ह्या त्यांच्या दोन मुली, असे त्यांचे छोटे व आनंदी कुटुंब आहे.

काही अपरिहार्य कारणांनी प्राध्यापक साहेबांचे सेवानिवृत्त
IFMIFM
वेतन बंद झाल्याने ते आर्थिक संकटात सापडतात. साहजिकच याची झळ त्यांच्या कुटुंबास बसते. मुलीऐवजी मुले असती तर आर्थिक संकटाचे ढग आपल्याकडे फिरकलेही नसते, असे त्यांना वाटते. सावित्री व बडकीस संकटाच्या तीव्रतेची जाणीव असल्याने लहान्या छुटकीस त्याची झळ पोहचू नये यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. छुटकीस शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी बडकी मुंबईस गाठण्याचा निर्णय घेते. प्राध्यापक शिवशंकर यांचा बडकीच्या निर्णयास विरोध असतो.

त्यांच्या मते बडकी मुंबईत जाऊनही काही करू शकणार नाही. वडिलांच्या विरोधास न जुमानता डोळ्यात स्वप्न घेऊन बडकी मायानगरी मुंबई गाठते. मुंबईत जीवनातील कटू वास्तव तिला सामोरे येते. येथील प्रत्येक क्षण तिची परिक्षा घेणारा ठरतो. कुटुंबाच्या गरजा भागवताना तिला पावलोपावली त्याग करावा लागतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर छुटकीही मुंबई गाठते. तिला जाहिरात कंपनीत नोकरी मिळते. तिथेच विवानशी (कुणाल कपूर) गाठ पडल्यावर ती त्याच्या प्रेमात पडते. छुटकी

IFMIFM
आल्यानंतर बडकीच्या समस्या आणखी वाढतात. आपल्या आयुष्यातील व्यक्त न करण्याजोगे वास्तव छुटकीस कळू नये, यासाठी तिचा स्वत:शीच संघर्ष चाललेला असतो. दरम्यान बडकी रोहनच्या (अभिषेक बच्चन) प्रेमात पडते. मात्र, रोहनला तिच्या जीवनातील वास्तव कळल्यावर हे नातेही क्षणभंगूर ठरते. छुटकीस बडकीच्या आयुष्यातील वास्तव कळल्यावर चित्रपटाचे कथानक अनपेक्षित वळण घेते. बडकीचे रहस्य काय आहे? रोहन बडकीचा स्विकार करेल? छुटकी आपल्या आई-वडिलास सर्व काही सांगेल का? यासाठी 'लागा चुनरी मे दाग' बघावा लागेल.

'लागा चुनरी मे दाग'ची फोटो गॅलरी