शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (11:41 IST)

गजानन महाराज आरती, जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।

जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया ।
जयदेव जयदेव ॥धृ॥
 
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।
तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥
 
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।
करूनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना ।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥
 
लीला अनंत केल्या बंकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥
 
व्याधी वारून केले कैकां संपन्न ।
करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥