बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : बुधवार, 22 मार्च 2023 (08:06 IST)

Gudi Padwa 2023: गुढीपाडवा माहिती मराठी, संपूर्ण पूजन विधी Gudi Padwa Puja Vidhi

gudipadwa
Gudi Padwa Puja Vidhi हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा. या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर गुढीचे पूजन करून गुढी उभारण्याची पद्धत आहे. शास्त्रानुसार गुढीचे पूजन कसे करावे हे जाणून घ्या-
 
 
पूजाविधी-
सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
 
आचमन-
डाव्या हातात पळी घेऊन उजवा हात उताणा धरावा. पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे आणि पुढील नावे घेत कृती करावी-
 
श्री केशवाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
 
श्री नारायणाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
 
श्री माधवाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
 
श्री गोविंदाय नमः ।
(असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे)
 
हात पुसून घ्यावे आणि हात जोडावे आणि म्हणावं- 
‘श्री विष्णवे नमः । श्री मधुसूदनाय नमः । श्री त्रिविक्रमाय नमः । श्री वामनाय नमः । श्रीधराय नमः । श्री हृषीकेशाय नमः । श्री पद्मनाभाय नमः । श्री दामोदराय नमः । श्री संकर्षणाय नमः । श्री वासुदेवाय नमः । श्री प्रद्युम्नाय नमः । श्री अनिरुद्धाय नमः । श्री पुरुषोत्तमाय नमः । श्री अधोक्षजाय नमः । श्री नारसिंहाय नमः । श्री अच्युताय नमः । श्री जनार्दनाय नमः । श्री उपेंद्राय नमः । श्री हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।’
 
पुनराचम्य- 
वरील प्रकारे पुन्हा एकदा आचमन करावे.
 
हात जोडून म्हणावे- 
इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थान देवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
 
देशकाल- 
डोळ्यांना पाणी लावावे. 
 
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलि प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके शुभकृत् नाम संवत्सरे, उत्तरायणे, वसंतऋतौ, चैत्रमासे, शुक्लपक्षे, प्रतिपद् तिथौ, मंद वासरे, रेवती दिवस नक्षत्रे, ऐंद्र योगे, बव करणे, मीन स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, मीन स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्चरौ एवं ग्रहगुणविशेषेणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ
 
संकल्प-
अक्षता उजव्या हाताच्या बोटांनी घ्यावा आणि हाताचा तळवा वरच्या दिशेला करावा. अंगठा सोडून उरलेल्या चार बोटांवरून अक्षता हळूहळू तळव्यावरती घसरत स्वतःचे गोत्र आणि नाव उच्चारावे. मग पुढील संकल्प करावा.
 
‘अस्माकं सर्वेषां, सह कुटुंबानां, सह परिवाराणां, क्षेम, स्थैर्य, अभय, विजय, आयुःआरोग्य प्राप्त्यर्थं अस्मिन् प्राप्त नूतन वत्सरे, अस्मद् गृहे, अब्दांतः नित्य मंगल अवाप्तये ध्वजारोपण पूर्वकं पूजनं तथा आरोग्य अवाप्तये निंबपत्र भक्षणं च करिष्ये । निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं / स्मरणं करिष्ये । कलश, घंटा, दीप पूजां करिष्ये ।’
 
‘करिष्ये’ म्हणताना उजव्या हातातील अक्षतांवर पाणी घालून ताम्हणात सोडाव्या. हात पुसावे. 
 
गणपतीपूजन करावे आणि ‘पूजनं करिष्ये’, असे म्हणत सुपारीवर किंवा नारळावर गणपतीची पूजा करावी. गणपती पूजन येत नसल्यास ‘स्मरणं करिष्ये’, असे म्हणावे गणपतीचे स्मरण करावे.
वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
महागणपतिं चिंतयामि नमः ।
 
कलश, घंटा, दीप पूजन-
गंध-फूल, अक्षता वाहून कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी
कलशाय नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।
घंटिकायै नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।
दीपदेवताभ्यो नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।
 
ब्रह्मध्वज पूजा
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । ध्यायामि ।
(हात जोडावे)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
(गंध लावावे)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । मंगलार्थे हरिद्रां समर्पयामि ।
(हळद वाहावी)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । मंगलार्थे कुंकुमं समर्पयामि ।
(कुंकू वाहवं)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि ।
(अक्षता वाहाव्या)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । पूजार्थे पुष्पं, तुलसीपत्रं, दुर्वांकुरान्, पुष्पमालांच समर्पयामि ।
(फुल, तुळशीचे पान अन् दुर्वा वहाव्या आणि फुलांचा हार घालावा)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । धूपं समर्पयामि ।
(उदबत्ती ओवाळावी)
 
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । दीपं समर्पयामि ।
(निरांजन ओवाळावी)
 
नैवेद्य- 
उजव्या हातात तुळशीची दोन पाने घेऊन त्यावर पाणी सोडावे. नैवेद्याच्या ताटाभोवती एकदाच पाणी फिरवावे. नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे.
 
‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः । नैवेद्यार्थे पुरस्थापित (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं निवेदयामि ।’ 
 
त्यानंतर ‘ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा, हे मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने तळवा देवाकडे येईल, अशा रितीने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा किंवा हात जोडून ‘ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा’, या मंत्राने देवाला नैवेद्य समर्पित करावा. 
 
नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन ‘समर्पयामि’ म्हणताना ते पाणी ताम्हणात सोडावे. 
 
‘ब्रह्मध्वजाय नमः । नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि, उत्तरापोशनं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि ।’ 
उजव्या हातात गंध-फूल घेऊन ते ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे. 
‘करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।’ ‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि ।’ (विड्यावर पाणी सोडावं.) 
‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः । फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि ।’(नारळावर पाणी सोडावं)
 
नंतर आरती करावी. कापूर आरती करुन प्रदक्षिणा घालाव्या- 
‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।’
 
नमस्कार करावा- 
‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः। नमस्कारान् समर्पयामि ।’
 
प्रार्थना करावी-
‘ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।।’
 
नंतर कडूलिंबाचे पान प्रसाद म्हणून ग्रहण करावं.