मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2015 (15:41 IST)

संकटमोचक हनुमान

श्रीरामभक्त हनुमानाला बळ, बुद्धी, विद्या, शौर्य व निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. संकटसमयी हनुमानाचे स्मरण केले जाते. 
 
संकटमोचक म्हणूनही हनुमानाची पूजा केली जाते. हनुमानाला शिवावतार तसेच रुद्रावतारही म्हटले जाते. 'रुद्र' प्रलयाचे अधिष्टाता असून देवादीदेव इंद्राचे सहकारीही आहे. विष्णू पुराणानुसार रुद्राचा उद्धार ब्रह्मदेवाजवळ असलेल्या भस्मापासून झाला होता. 
 
'हनुमान' या शब्दातील 'ह' ब्रह्माचा, 'नु' अर्चनाचा, 'मा' लक्ष्मीचा, व 'न' पराक्रमाचा द्योतक आहे.
 
हनुमानाला सर्व देवाकडून वरदान प्राप्त झाले होते. श्रीरामाचा सेवक म्हणून हनुमानाला पूजले जाते. राजदूत, नीतिज्ञ, विद्वान, रक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान व बुद्धिमान म्हणूनही हनुमानाचा उल्लेख विष्णू पुराणात आला आहे. 
 
शास्त्रीय संगीतातील तीन आचार्यांमध्ये हनुमानजी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त शार्दूल व कहाल असेल. 'संगीत पारिजात' हनुमानाचे संगीत-सिद्धांतावर आधारित आहेत. 
 
हनुमानाने सर्वप्रथज्ञ रामकथा शिळेवर लिहिली होती, असे सांगितले जाते. रामकथा ही रामायणाआधीच लिहिली गेली होती. 'हनुमन्नाटक' या नावाने ती प्रसिद्ध आहे. 
 
हनुमानाच्या जन्म- स्थळाविषयी निश्चित सांगता येत नाही. मध्यप्रदेशातील  आदिवासी बांधव हनुमानाचा जन्म रांची जिल्ह्यातील अंजन येथे झाला होता, असे मानतात. हनुमानाचा जन्म कर्नाटक राज्यात झाला होता अशी कर्नाटकमधील भाविकांची धारणा आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी येथे झाला होता, असे मानतात.
 
अंजनीच्या कानात पवनाने प्रवेश केल्याने ती गर्भवती राहिली व हनुमानाचा जन्म झाला, असा विष्णू पुराणात उल्लेख आहे. 
 
आनंद रामायणानुसार हनुमानाचा आठ श्रीमंतामध्ये उल्लेख केला जातो. अश्वत्थामा, बळी, व्यास, विभीषण, नारद, परशुराम व मार्कण्डेय हे इतर सात देव आहेत.