एकनाथ षष्ठी : संत एकनाथ महाराजांनी या दिवशी समाधी घेतली

eaknath maharaj
Last Modified मंगळवार, 30 मार्च 2021 (13:03 IST)
संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो.
श्री एकनाथष्ठी हा दिवस श्री एकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा केला जातो. पैठण येथील नाथषष्ठीची वारी मोठी असून यासाठी मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध जागांहून आलेल्या ४७५ दिंडया, भानुदास-एकनाथ चा गजर हयाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.

पैठण येथे फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होतं. षष्ठीला पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक होतो.

गावातील मंदिरातून नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी श्री एकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. येथे आरती होते आणि सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या मठात विसावतात.

सप्तमीच्या सोहळ्याला रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला छबिना असे म्हणतात. मिरवणूक काढून पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर येथे पादुकांना गोदास्नान घातलं जातं, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. येथे वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तन इत्यादींचे आयोजन केलं जातं.

अष्टमीला काला दिंडी निघते. या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळल्या जातात. हे दृश्य बघण्यासाठी हजारो भक्त हाजर असतात. समाधी मंदिरात पोहचल्यानंतर मंदिराच्या समोर पटांगणावर शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात पावल्या खेळण्यात लीन होऊन जातात.

मंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गुळ- लाह्यांचे मोठेमोठे लाडू बांधण्यात येतात. मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवली जाते. सूर्यास्तावेळी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून हंडी फोडण्यात येते. त्याचा प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो.

या उत्सवात हजारो वारकरी सहभागी होतात. फाल्गुन षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने याला पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. नंतर नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतली त्यामुळे श्री एकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

पंचपर्व याप्रकारे आहेत - नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह, नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह, श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथमहाराज जलसमाधी.
यामुळे फाल्गुन षष्ठीला वेगळचं महत्त्व आहे आणि भाविक या सोहळ्याचा आनंद घेतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व

गंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व
भागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...

Ganga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...

Ganga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि सन्मानासाठी हे खास 8 उपाय
यंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...

आपल्यावर भगवान शिवाचे ऋ‍ण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती

आपल्यावर भगवान शिवाचे ऋ‍ण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती
मनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?
1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...

Shankaracharya Jayanti 2021: आज आहे शंकराचार्य जयंती, ...

Shankaracharya Jayanti 2021: आज आहे शंकराचार्य जयंती, त्यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या
धार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...