श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi

Name of Bholenath
Name of Shankar
Last Updated: सोमवार, 4 जुलै 2022 (08:22 IST)
श्री शिवस्तुती ( Shiv stuti ) कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १||
रवींदु दावानल पूर्ण भाळी | स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी | ब्रम्हांडधीशा मदनांतकारी | तुजवीण || २ ||
जटा विभूती उटी चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची | पंचानना विश्र्वनिवांतकारी | तुजवीण || ३ ||
वैराग्ययोगी शिव शूलपाणी | सदा समाधी निजबोधवाणी | उमाविलासा त्रिपुरांतकारी | तुजवीण || ४ ||
उदार मेरू पति शैलजेचा | श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा | दयानिधी तो गजचर्मधारी | तुजवीण || ५ ||
ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ | भुजंगमाला धरि सोमकांत | गंगा शिरी दोष महा विदारी | तुजवीण || ६ ||
कर्पूरगौरी गिऱिजा विराजे | हळाहळे कंठ निळाचि साजे | दारिद्र्यदु:खें स्मरणे निवारी | तुजवीण || ७ ||
स्मशानक्रीडा करिता सुखावे | तो देवचुडामणि कोण आहे | उदासमुर्ती जटाभस्मधारी | तुजवीण || ८ ||
भूतादिनाथ अरि अंतकाचा | तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा | राजा महेश बहुबाहुधारी | तुजवीण || ९ ||
नंदी हराचा हरि नंदिकेश | श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरेश | सदाशिव व्यापक तापहारी | तुजवीण || १० ||
भयानक भीम विक्राळ नग्न | लीलाविनोदे करि काम भग्न | तो रुद्र विश्र्वंभर दक्ष मारी | तुजवीण || ११ ||
इच्छा हराची जग हे विशाळ | पाळी सुची तो करि ब्रम्हगोळ | उमापती भैरव विघ्नहारी | तुजवीण || १२ ||
भागीरथीतीर सदा पवित्र | जेथें असे तारक ब्रम्हामंत्र | विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी | तुजवीण || १३ ||
प्रयाग वेणी सकळा हराच्या | पादारविंदी वहाती हरीच्या | मंदाकिनी मंगल मोक्षधारी | तुजवीण || १४ ||
कीर्ती हराची स्तुती बोलवेना | कैवल्यदाता मनुजा कळेना | एकाग्रनाथ विष अंगिकारी | तुजवीण || १५ ||
सर्वांतरी व्यापक जो नियंता | तो प्राणलिंगाजवळी महंता | अंकी उमा ते गिरिरूपधारी | तुजवीण || १६ ||
सदा तपस्वी असे कामधेनू | सदा सतेज शशिकोटिभानू | गौरीपती जो सदा भस्मधारी | तुजवीण || १७ ||
कर्पूरगौरी स्मरल्या विसावा | चिंता हरी जो भजका सदैवा | अंती स्वहीत सूचना विचारी | तुजवीण || १८ ||
विरामकाळी विकळ शरीर | उदास चित्ती न धरीच धीर | चिंतामणी चिंतने चित्तहारी | तुजवीण || १९ ||
सुखवसानें सकळे सुखाची | दु:खवसाने टळती जगाची | देहावसानी धरणी थरारी | तुजवीण || २० ||
अनुहत शब्द गगनीं न माय | त्याचेनि नादे भाव शून्य होय | कथा निजांगे करुणा कुमारी | तुजवीण || २१ ||
शांति स्वलीला वदनी विलासे | ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे | भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी | तुजवीण || २२ ||
पितांबरे मंडित नाभि ज्याची | शोभा जडीत वरि किंकिणीचि | श्रीदेवदत्त दुरितांतकारी | तुजवीण || २३ ||
जिवा-शिवाची जडली समाधी | विटला प्रपंची तुटली उपाधी | शुद्धस्वरे गर्जति वेद चारी | तुजवीण || २४ ||
निधानकुंभ भरला अभंग | पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग | गंभीर धीर सुर चक्रधारी | तुजवीण || २५ ||
मंदार बिल्वे बकुलें सुवासी | माला पवित्र वहा शंकरासी | काशीपुरी भैरव विश्र्व तारी | तुजवीण || २६ ||
जाई जुई चंपक पुष्पजाती | शोभे गळा मालतिमाळ हाती | प्रतापसूर्यशरचापधारी | तुजवीण || २७ ||
अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे | संपूर्ण शोभा वदनी विकासे | नेई सुपंथे भवपैलतीरी | तुजवीण || २८ ||
नागेशनामा सकळा झिव्हाळा | मना जपे रें शिमंत्रमाळा | पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी | तुजवीण || २९ ||
एकांति ये रे गुरुराज स्वामी | चैतन्यरुपी शिव सौख्य नामी | शिणलो दयाळा बहुसाल भारी | तुजवीण || ३० ||
शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको | योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको | काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको | ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको || ३१ ||


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

खंडोबाची आरती

खंडोबाची आरती
जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥ मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ...

Bhagavad Gita : गीतेची शिकवण घेणारा अर्जुन हा पहिलाच ...

Bhagavad Gita : गीतेची शिकवण घेणारा अर्जुन हा पहिलाच व्यक्ती नव्हता,जाणून घ्या कोण होता ?
भगवद्गीतेबद्दल असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने त्याचे ज्ञान सर्वप्रथम अर्जुनाला दिले ...

Peacock Feathers Upay श्रावण महिन्यात मोरपंखाचा हा एक उपाय ...

Peacock Feathers Upay श्रावण महिन्यात मोरपंखाचा हा एक उपाय आर्थिक भरभराट देईल
सर्वांना माहित आहे की श्रावण मासमध्ये मुख्यतः महादेवाची पूजा केली जाते, यामुळे या काळात ...

Shukrawar Katha कहाणी शुक्रवारची देवीची

Shukrawar Katha कहाणी शुक्रवारची देवीची
आटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची ...

Jivati Aarti जिवतीची आरती

Jivati Aarti जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...