गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (15:45 IST)

रात्रीच्या वेळेस घराची साफ सफाई का म्हणून करू नये?

प्राचीन काळापासून बहुतांश घरांमध्ये आजही रात्रीच्या वेळी साफ-सफाई, स्वच्छता केली जात नाही अशी प्रथा चालू असून यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे. येथे जाणून घ्या, रात्रीच्या वेळी घरामध्ये साफ-सफाई का करू नये.
 
रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे अशुभ असते...
घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ, कचरा असणे आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच त्याचबरोबर घर-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अस्वच्छता अशुभ मानली जाते. घर स्वच्छ असल्यास आपले मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहते. घरामध्ये अस्वच्छता असेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे अपशकून मानले जाते. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी साफ-सफाई करणे वर्ज्य आहे.
 
यामुळे रात्री घरात साफ-सफाई करू नये...
रात्री घरामध्ये साफ-सफाई करणे वर्जित आहे. सकाळच्या वेळी घरात साफ-सफाई केल्यानंतर घरातील सर्व सदस्य स्नान करतात, ज्यामुळे शरीरावरील किटाणू साफ होतात. शरीरावरील किटाणू नष्ट झाल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते. जर रात्रीच्या वेळी घरामध्ये स्वच्छता केली तर धूळ, किटाणू पुन्हा घरातील सदस्यांच्या शरीरावर चिटकतील रात्रीच्या वेळी सर्व सदस्य स्नानही करत नाहीत, त्यामुळे ते किटाणू आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या कारणामुळे रात्री घरामध्ये साफ-सफाई करू नये.