बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सिंहस्थ 2016 मध्ये गुरु आणि राहूमुळे गुरु चाण्डाल योग बनेल

वर्ष 2016मध्ये मप्रच्या उज्जैनमध्ये सिंहस्थचा मेळा लागणार आहे. सिंहस्थ 22 एप्रिल ते 21 मे 2016 पर्यंत राहणार आहे. उज्जैनचे  ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार जेव्हा गुरु सिंह राशीत, सूर्य आपल्या उच्च मेष राशीत आणि चंद्रमा तुला राशीत असतो, तेव्हा उज्जैनमध्ये सिंहस्थ मेळ्याची सुरुवात होते. 
  
म्हणून म्हणतात सिंहस्थ  
गुरुच्या सिंह राशीत असल्याने हे आयोजन होत, म्हणून याला सिंहस्थ म्हणतात. उज्जैनमध्ये जेव्हा सिंहस्थाचा मेळा लागेल तेव्हा, गुरु चण्डाल योग असेल. त्या वेळेस सिंह राशीत गुरुसोबत राहूपण राहणार आहे, यामुळे गुरु चाण्डाल योग तयार होत आहे. सूर्य आणि शुक्र उच्च राशीत असतील. मंगळ स्वत:ची राशी वृश्चिकामध्ये राहील. मंगळासोबत त्याचा शत्रू शनीपण वृश्चिक राशीत राहणार आहे.  

1980मध्ये असा योग बनला होता  
8 जानेवारी 2016ला राहू सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर गुरु आणि राहू सिंह राशीत राहतील. राहू आणि केतू एक राशीत 18 महिन्यापर्यंत राहतात. म्हणून राहू 8 जुलै 2017ला राशी बदलून कर्क राशीत जाईल. या संबंधांमध्ये पंचांगात भेद असू शकतात. 1980मध्ये गुरुसोबत राहूची युती सिंह राशीत बनली होती. आणि त्या वेळेस देखील सिंहस्थाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सिंह राशीत गुरुसोबत शनी मंगळ देखील होते.  
 
सिंहस्थामध्ये राहणार आहे प्रचंड गर्मी  
2016 मध्ये होणार्‍या सिंहस्थामध्ये राहू आणि गुरू एकत्र सिंह राशीत राहतील, मंगळ स्वराशी वृश्चिकामध्ये राहील, यामुळे सिंहस्थच्या वेळेस प्रचंड गर्मी राहणार आहे. पं. शर्मानुसार शुक्र उच्चचा असेल, ज्यामुळे हे आयोजन देश-विदेशात अती लोकप्रिय होईल. शनीमुळे सिंहस्थात  संत आणि प्रशासनामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे, तसेच अत्यधिक गर्दी असल्याने व्यवस्था बिघडू शकते. सूर्य उच्च राशीत राहील जो विपरीत परिस्थितींना लवकरच सांभाळून घेईल.  
 
ह्या आहे सिंहस्थ स्नानाच्या मुख्य तारखा      
22 एप्रिल 2016 पौर्णिमा  
06 मे 2016 वैशाख अमावस्या
09 मे 2016 अक्षय तृतीया
11 मे 2016 शुक्ल पंचमी
16 मे 2016 एकादशी आणि प्रदोष स्नान
21 मे 2016 पौर्णिमा  
09 मे 2016 अक्षय तृतीया
11 मे 2016 शुक्ल पंचमी
16 मे 2016 एकादशी आणि प्रदोष स्नान