शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. होळी
Written By वेबदुनिया|

होळी खेळताना हे करू नका!

WD
होळी हा सण नव्हे आनंदोत्सव आहे. पण काळासोबतच होळीत अनेक चुकीच्या बाबीही आल्या आहेत. मैत्री दूर उलट कुणाशी 'पंगा' घेण्याची स्थिती यादिवशी अतिउत्साहामुळे येते. त्यामुळे होळी, रंगपंचमी खेळताना खालील बाबी लक्षात ठेवा.

* गुलाल तसेच कच्चे रंग न वापरू नका. काही लोक शेण, माती, न निघणारे पक्के तसेच विषारी रंग यांचा सर्रास वापर करतात. त्यामुळे या सणाचे पावित्र्य नष्ट होते. म्हणून यांचा वापर करणे टाळा.
* यावेळी वाईट तसेच अश्लील गमती-जमती करू नका.
* एखाद्याला चिडवताना त्याच्या स्वाभीमानाला धक्का लागेल असे काही चिडवू नका.
* या सणाला कोणाचेही मन दुखावले जाईल असे वागू नका.
* होळीत झाडे कापून टाकू नका. लाकडाची हानी म्हणजे पर्यावरणाची हानी हे लक्षात घ्या.
* प्रेम आणि आनंद वाटण्याचा हा सण आहे, हे लक्षात ठेवा.