Last Modified: लंडन , शुक्रवार, 25 जून 2010 (10:16 IST)
कॅट पॅरी नाचताना आपटली, 17 टाके!
पॉप सिंगर कॅट पॅरी एका क्लबमध्ये डान्स करताना अचानक आपटल्याने तिला 17 टाके लावावे लागले असून, काही दिवस तरी तिला आता आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टोरंटोतील एका क्लबमध्ये ही घटना घडली. कॅट नाचत असतानाच अचानक तिचा तोल गेला,कॅटला 17 टाके नेमके कोणत्या भागाला घालण्यात आलेत, हे सांगण्यास तिने नकार दिला आहे.
आपल्या ट्विटरवरील अकाउंटमध्ये तिने या संदर्भात माहिती दिली असून, 17 टाके लावण्यात आल्याचे मान्य केले आहे.