शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: वॉशिंग्टन , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (16:41 IST)

'शुक्रा'वरही होते समुद्राचे अस्तित्व

'शुक्र' ग्रहावरील अती तप्त तापमान पाहिले तर, कोणालाही वाटणार नाही की, येथे जीवनाचे प्रतीक असणार्‍या एका विशाल समुद्राचे अस्तित्त्व होते.

'नेचर' नावाच्या एका पत्रिकेमध्ये प्रसारीत झालेल्या रिपोर्टनूसार शुक्र ग्रहाच्या बाबतीत 'वीनस एक्सप्रेस' या अंतरिक्ष यानाद्वारे प्राप्त आकड्यांनूसार शुक्र ग्रहाच्या चोहो बाजूने चुंबकीय रक्षा कवचाची अनुपस्थिती आणि ग्रहाच्या हळूवार फिरण्याच्या गतीमुळे तेथे जीवनाच्या अस्तित्वासाठी उपयुक्त असलेले वातावरण तयार होऊ शकले नाही.

शुक्रावर वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमानावर होत असल्याचे या पत्रिकेत म्हटले आहे. ज्याचा शुक्राच्या संरचनेवर मोठा प्रभाव पडत असतो.


'शुक्र' ग्रहाबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्व प्रथम अमेरिकेने १९६२ साली मॅरिनर दो नामक एका अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपन केले होते. यानंतर विविध प्रकारचे तब्बल ३० यान पाठवण्यात आले. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या यानांमध्ये व्हिनस यान खास आहे, कारण की हे विविध प्रकारच्या वैज्ञानिक यंत्रांनी युक्त आहे.

हे यान ग्रहाच्या वातावरणातील बाष्प आणि कुठल्याही प्रकारच्या चुंबकीय क्षेत्राच्या अस्तित्वाचा तपास लावू शकते.