गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2015 (11:21 IST)

50 मुलांचा पिता व्हायची इच्छा

जगामध्ये प्रत्येकाच्या आपापल्या इच्छाआकांक्षा व ध्येये असतात. कुणाला भरपूर पैसा हवा असतो तर कुणाला मोठं घर, कुणाला मोठी गाडी हवी हवीशी वाटते तर कुणाला परदेशात फिरण्याचं नाद असतो. पण तुर्कीमधील एक व्यक्तीची इच्छा मात्र जरा वेगळीच आहे. महागाईने कळस गाठलेल्या या लोकसंख्येत झपाट्याने भर पडत असलेल्या सध्याच्या युगात प्रत्येकजण आपल्या कुटुंबाचा आकार त्रिकोणी चौकोनी ठेवण्यास प्राधान्य देताना दिसतो. पण या महाशयांचे जास्तीत जास्त मुले जन्मास घालण्याचे स्वप्न आहे.

थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पन्नास. हलित तकीन असे या व्यक्तीचे नाव असून आजही तो आपल्या चार पत्नीपासून 32 मुलांचा पिता बनला आहे. त्यात आणखी भर टाकण्याची त्याची इच्छा आहे.
तुर्कीमध्ये बहुविवाह बेकायदा आहे. असे असूनही हलितने 1882 मध्ये पहिल्या अधिकृत लग्नानंतर आणखी तीन बेकायदा विवाह केले. तुर्कीच्या हताय प्रांतात राहणार्‍या 54 वर्षीय हलितच्या पहिल्या पत्नीने हल्लीच एक मुलाला जन्म दिला असून त्याचे अहमत असे नाव ठेवले आहे. त्याच्या 32 अपत्यांपैकी 12 मुले व 20 मुली आहेत. त्या सगळ्यांना तो सारखाच जीव लावतो. प्रकृतीने साथ दिली तर मुलांची संख्या 50 पर्यंत नेण्यास आपल्याला आवडेल. असे तो सांगतो. त्याच्या चारही पत्नी वेगवेळ्या राहतात, पण त्यांचे संबंध उत्तम आहेत.