मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (22:39 IST)

अफगाणिस्तानच्या दोन प्रांतात पाकिस्तानी विमानांचा बॉम्बस्फोट, पाच मुलांसह अनेकांचा मृत्यू

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तोफ आणि हेलिकॉप्टरने केलेल्या हल्ल्यात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने ही माहिती दिली आहे. या आठवड्यात पाकिस्तानमधील नव्या सरकारने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील खोस्त आणि कुनार प्रांतांमध्ये दोन्ही देशांच्या सीमेवर रात्रभर हा हल्ला सुरू होता, असे त्यांचे म्हणणे आहे. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पाकिस्तानी लष्करी विमानांनी सेपेराह जिल्ह्यातील चार गावांवर बॉम्ब टाकले. या हल्ल्यांमध्ये पाच मुले आणि अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये किमान 40 सामान्य लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय 20 जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे जे काही वर्षांपूर्वी लष्करी कारवाईनंतर शेजारच्या वझिरीस्तानच्या पाकिस्तानी प्रदेशातून पळून गेले होते.
 
या 40 लोकांपैकी 29 जण एकाच कुटुंबातील आहेत. कुनारमध्ये सीमेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्य गेल्या तीन दिवसांपासून मारवाडा, शेल्टन आणि नारी जिल्ह्यात तोफखाना वापरून गोळीबार करत आहे.कुणार येथे शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असून याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत.