शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अफजल गुरूच्या फाशीचा बदला घेणार!

WD
पाकिस्तान लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या अनेक दहशतवादी संघटना एकवटल्या आहेत. भारतीय संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गरुच्या फाशीचा बदला घ्यायची शपथच आता या दहशतवादी संघटनांनी घेतली आहे.

इस्लामाबाद मधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये दहशतवादी संघटनांनी सम्मेलन आयोजित करून त्यात ही घोषणा केली. या संम्मेलनाचे आयोजन युनायटेड जिहाद काऊन्सिलच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांत प्रथमच पाकिस्तानच्या राजधानीत दहशतवादी संघटनांनी ही सभा आयोजित केली होती. या बैठकीत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, बद्र मुजाहिदीन, हरकत-अल-मुजाहिदीन आणि जिहाद काऊन्सिल इ. संधटनांचे नेते उपस्थित होते.