शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

इंडोनेशिया स्‍फोटामागे नुरदीन सुत्रधार

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्‍ये 16 जुलै रोजी दोन लक्‍झरी हॉटेल्‍समध्‍ये झालेल्‍या आत्मघाती हल्‍ल्‍यामागील सुत्रधाराचे स्‍केचेस तयार करण्‍यात इंडोनेशियन पोलिसांना यश आले आहे. नूरदीन टॉप नामक ही व्‍यक्ती असल्‍याचे समोर आले असून तो अनेक गुन्‍ह्यांसाठी तो मलेशियन पोलिसांना हवा आहे.

नूरदीप हा आग्‍नेय आशियायी दहशतवादी संघटना ेमा इस्लामियातून वेगळ्या झालेल्‍या गटाचा म्होरक्या आहे. जेमा इस्लामियाचा माजी नेता नसीर अब्बासनेही हल्‍ल्‍यासाठी नूरदीन जबाबदार असल्‍याचे म्हटले आहे.