गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

कसाब जिवंतच!

लाहोर- मुंबईतील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला भारताने फासावर चढवले असले तरी पाकिस्तानमधील एका साक्षीदाराने कसाब जिवंत असल्याचा दावा केला आहे. साक्षीदाराच्या या जबाबामुळे सरकारी पक्षाची नाचक्की झाली असून पाकमधील हा खटला कसा निकालात निघणार याची उत्सुकता वाढली आहे.
 
आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला दाखल केला. मात्र, आरोपींनाच लाभ होईल, अशा पद्धतीने सरकारी पक्षाकडून युक्तिवाद सुरू असून आता सरकारी पक्षाचे साक्षीदारही आपल्या जबाबापासून उलटत आहेत. कसाबच्या शाळेचे हेडमास्तर मुरस्सीर लखवी यांनी सुनावणीवेळी कसाब जिवंत असल्याचा दावा केल्याने सरकारी पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. भारतात फासावर चढवण्यात आलेला व्यक्ती कसाब होता की नाही, यावर लखवी काहीच म्हणाले नाहीत.