गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2015 (12:45 IST)

गावात राहते फक्त एकटेच जोडपे

माद्रिद- जगाच्या पाठीवर अनेक आश्चर्य आढळून येतात. त्यातील काहींवर आपला विश्वाही बसत नाही. स्पेन या देशातही असेच एक जोडपे गेल्या 45 वर्षांपासून एका गावात एकटेच राहत आहे. या दोघांशिवाय अन्य कुणीही या गावात वास्तव्यास नाही.
 
स्पॅनिआर्डस ज्युआन मार्टीन (82) आणि सिनफोरेसा कोलोमर अशी या पती-पत्नीची नावे आहेत. स्पेनच्या वॅलेन्सिवा प्रांतातील ला इस्ट्रेला या गावात राहतात. स्पेनमध्ये 1936 साली गृहयुद्ध झाले होते. त्यानंतर हजारों नागरिकांनी रोजगारासाठी शहरांकडे पलायन केले मात्र स्पॅनिआर्डस आणि सिनफोरेसा या दोघांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला.
 
आज जवळपास 45 वर्ष हे दोघेच या गावात एकटे राहत आहे. या गावात कधीकाळी 200 लोकांची वस्ती होती, मात्र आता हे दोघेच येथे वास्तव्यास आहेत. शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यांच्याजवळ डझनभर पाळीव कुत्री आणि मांजर आहेत. गावातच भावना गुंतल्याने त्यांना गाव सोडून जाणे शक्य झाले नाही.
 
या पती-पत्नीच्या जीवनावर आधारीत जंगल्स इन पॅरिस, नावाच्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
कधीकाळी या गावात पो‍लीस, पुजारी, शिक्षकांसह राजकीय पुढार्‍यांचा वावर होता, मात्र नैसर्गिक आपत्तीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर पुन्हा कधीही येथे पूर्वीचे वैभव पहायला मिळाले नाही.