शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

चीनच्या बाजारात 'गांधीजी'

ज्येष्ठ भारतीय मुत्सद्दी पास्कल अँलन नाजरेथ यांनी महात्मा गांधीजी यांच्यातील नेतृत्वगुणांवर लिहिलेल्या पुस्तकाचे मँडरिन या चिनी भाषेत भाषांतर करण्यात आले असून, हे पुस्तक आता लवकरच चीनमधील पुस्तकांच्या बाजारात दिसणार आहे.

WD
आजच्या हिंसाचार व रक्तपातग्रस्त जगात गांधीजींच्या या गुणांचे मूल्य मोठे आहे, असे मानले जात आहे. चीनमधील नव्या पिढीच्या नेतृत्वाला गांधीजींच्या मूल्यधारणेत मोठा रस असून, माओ झेडाँग यांच्या विचारांचा प्रभाव असूनही हे लोक गांधीजींच्या तत्त्वज्ञानाकडे वळलेले दिसत आहेत.

वातावरण असे बदलत असताना मँडरिनमध्ये गांधीजींवरचे हे पुस्तक येत आहे. ‘म. गांधी यांची प्रभावी नेतृत्वशैली’ असे या पुस्तकाचे नाव आहे. चीनमधील भारताचे राजदूत एस. जयशंकर व चीनच्या कर्मशिअल प्रेसचे मुख्य अधिकारी यू दियानली यांच्यात यासंदर्भात करारावर आज स्वाक्षर्‍या झाल्या. २0१३ मध्ये ते बाजारात येईल. ‘गांधी मेमरिज’ हे अमेरिकन पत्रकार विल्यम शिरर यांचे पुस्तक चीनमध्ये आता उपलब्ध करून देण्यात आले आहे. चीनमधील नॉर्मल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक शांग क्वानयू यांनी नव्या पुस्तकाचे भाषांतर केले आहे. अलीकडेच चीनमधील एका रॉक संगीतावरील मासिकाने स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून महात्मा गांधीजींचा फोटो प्रसिद्ध केला आहे.