बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: बीजिंग , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (16:34 IST)

चीनने भारतात घुसखोरी केल्याचे केले कबूल

चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे कबूल केले आहे. चीनने गुरुवारी पहिल्यांदा जाहीरपणे भारतात घुसखोरी केल्याची कबूली दिली आहे. चीनच्या जवानांनी 2013 मध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे चीनच्य संरक्षण विभागाचे  लष्कर प्रवक्ते कर्नल गेंग यानशेंग यांनी म्हटले आहे. नियंत्रण रेषेवरुन उडालेल्या गोंधळामुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
 
याविषयी चीनच्या लष्कराने प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चीनच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल गेंग यानशेंग यांनी उपस्थितांना संबो‍धित केले. यात यानशेंग यांनी गेल्या वर्षी भारत - चीन नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करणार्‍या काही घटना घडल्या होत्या. पण आम्ही त्यावर चर्चा करुन तोडगा काढला असे मान्य केले. सीमा रेषेविषयी गोंधळ असून दोन्ही देशांची सीमा रेषेविषयी स्वतंत्र धारणा आहे असे येनशांग यांनी स्पष्ट केले.