बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग, कंपनीला 366 कोटींचा दंड

सेंट लुईस- लहान मुलांची उत्पादने बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे महिलेला अंडाशयाचा कर्करोग झाल्याची दुसरी घटना समोर आल्यामुळे न्यायालयाने कंपनीला दंड ठोठावला आहे. कोर्टाने कंपनीला या महिलेला 55 दशलक्ष डॉलरची (366 कोटी रुपये) भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
 
अमेरिकेतील साऊथ डकोटा येथील महिलेने अनेक वर्षे जॉन्सन अँड जॉन्सन पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप केला आहे. अलीकडेच याच कंपनीच्या पावडरमुळे अलाबामा येथील एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीला दंड ठोठावण्यात आला होता. कंपनीच्या विरोधात सध्या अशा प्रकारचे 1200 खटले सुरू आहेत. याचे कर्करोगाशी संबंध आहे याविषयी 45 वर्षांपूर्वी संशोधन सुरू झाले असून कंपनीलाही या धोक्याची पूर्णं माहिती होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
 
कंपनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. कंपनीची सर्वे उत्पादने वापरासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.