शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्यूयॉर्क , मंगळवार, 31 जानेवारी 2012 (16:02 IST)

ट्यूब स्पेस लॅब स्पर्धेच्या अंतिम फेरीत नऊ भारतीय!

यू ट्यूब स्पेस लॅब स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ६0 स्पर्धकांमध्ये ९ भारतीय विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अंतिम फेरीत अमेरिकेचे सर्वाधिक १0 स्पर्धक आहेत. जगातील ८0 देशांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत यू-ट्यूबसह लेनोवो, नासा, युरोपियन स्पेस व जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन या एजंसीचा मुख्य सहभाग होता. अंतिम फेरीतील स्पर्धकांपैकी हैदराबादची नववीतील विद्याथिर्ंनी नित्या राजूने एका दिवसातच दोन मिनिटांचा अंतराळवीरांबाबतचा व्हिडियो अपलोड केला होता.

भारतकडून सर्वात
जास्त प्रवेशिका
स्पर्धेतील एकूण प्रवेशिकांमध्ये भारताकडून सर्वात जास्त ४0 टक्के तर अमेरिकेकडून १५ टक्के प्रवेशिका आल्या होत्या. इंग्लंड, रूस, इस्त्रायल, कॅनडा, स्पेन, इटली, पोलंड व जपानचे विद्याथीर्ही स्पर्धेत सहभागी झाले होते.