शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

तुमची कंपनी तुम्हाला पीरियड्सच्या दिवसांमध्ये सुटी देती का?

युकेची कंपनी Coexistने मार्च महिन्यात आपल्या फीमेल स्टाफसाठी एक पॉलिसी काढली होती. या पॉलिसीत त्यांना पीरियड्सच्या दरम्यान सुटी देण्याची घोषणा करण्यात आली होती.  
 
Coexistला बघून भारतातील शेजारील देश नेपालमध्येही एका कंपनीने अशीच काही घोषणा केली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट Sasto Dealने पीरियड्सच्या दरम्यान आपल्या फीमेल स्टाफला सुटी देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ज्या महिला त्या दिवसांमध्ये स्वत:ला अस्वस्थ आणि कमजोर अनुभवतात, त्यांना सुटी दिली जाईल.  
 
जगातील किमान अर्ध्या स्त्रियांना पीरियड्सदरम्यान तीव्र वेदना आणि शारीरिक कमजोरीचा सामना करावा लागतो. अशात हा एक असा विषय आहे ज्यावर जगभरातील स्त्रियांचे एकमत आहे. काठमांडूची कंपनीने ही घोषणा करून तेथे काम करणार्‍या स्त्रियांचे मन जिंकले आहे.  
 
बिझनेस डेवलेपमेंट मॅनेजर रिचा राजभंडालीने सांगितले की पीरियड्सदरम्यान सर्वच महिला फारच असहज अनुभवतात. कामात देखील त्या आपले शत-प्रतिशत देऊ शकत नाही. आम्हाला असे वाटले की त्यांनी घरी बसून काम करणे व त्यांना आराम देणे जास्त गरजेचे आहे.  
 
कंपनीच्या या पुढाकारामुळे सर्वजण फारच खूश आहे. या कंपनीत काम करणारी आयुश्री थापाने सांगितले की कंपनीचे हे पाऊल प्रगतिशील विचारांना दर्शवतो. कंपनीत काम करणार्‍या पुरुष कर्मचार्‍यांनी देखील या निर्णयाचा स्वागत केला आहे.  
 
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जपानमध्ये Menstrual leaveचे कॉन्सेप्ट 1947पासूनच आहे. त्याशिवाय हे ताइवान, साऊथ कोरिया, इंडोनेशिया आणि चीनच्या काही भागांमध्ये यशस्वी ठरले आहे. आता काठमांडूच्या या कंपनीने देखील एक पाऊल पुढे उचललं आहे.