बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

बिलावल सांभाळणार बेनझीरचा राजकीय वारसा

बेनझीर यांचे राजकीय वारसदार बिलावल

पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या अध्यक्षपदी बेनझीर भुट्टो यांचा एकोणवीस वर्षीय मुलगा बिलावल यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सुरूवातीस बिलावलने बेनझीर यांचे मृत्युपत्र वाचून दाखवले. बेनझीर यांचे पती असिफ अली झरदारी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ते बिलावला यांस मार्गदर्शन करतील.

मात्र पक्षाच्या घटनेनुसार पक्षाध्यक्ष पदासाठी उमेदवाराने वयाचे बावीस वर्ष पूर्ण केले असणे आवश्यक आहे. पक्षाने पाकिस्तानात आठ जानेवारीस होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आअगोदर पक्षाच्या प्रवक्त्या शेरी रेहमान यांनी बिलवाल पक्षाध्यक्षपद सांभाळण्यास तयार नसून ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते.

बिलवाल यांचा जन्म एकवीस सप्टेबर, 1988 मध्ये झाला असून दुबईतील रशीद स्कूल ऑफ बॉइज येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सद्या ते ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहेत. बिलावल याने तायकांडोत ब्लॅक बेल्ट मिळवला असून त्यास घोडसवारीचा छंदही आहे. याअगोदेर पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मखदुम अमिन फाहिंम पक्षनेतृत्व करणार असे मानण्यात येत होते.