शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (08:02 IST)

भारत-नेपाळचे नाते जुने

मोदीभारत आणि नेपाळचे नाते गंगा नदी आणि हिमालय पर्वताइतकेच जुने आहे. माझ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची सुरुवात मी काशीमधून केली, आणि आता मी  पशुपतिनाथाच्या चरणांपाशी उभा आहे. सम्राट अशोक युद्ध सोडून बुद्धाला शरण गेले. आणि इतिहासामध्ये एक नवे पान लिहिले गेले, असे सांगून नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘संविधान विविध घटकांना जोडण्याचे काम करते. विवादांना संवादाकडे घेऊन जाते. हे काम नेपाळमध्ये होईल असा मला विश्वास वाटतो.’