शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

भारत प्रकरणी पाक सरकारला सर्वपक्षीय पाठिंबा

कोणत्‍याही घटनेत राजकारण करणा-या भारतीय राजकीय पक्षांपेक्षा जिथे कधीही लोकशाही नांदू शकली नाही त्‍या पाकिस्तानातील राजकीय पक्ष आता अडचणीच्‍या वेळी सरकारच्‍या बाजूने एकजुटीने उभे राहिले आहेत. मुंबईवर हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतासोबत निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्‍यासाठी सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांच्‍या अध्यक्षतेखाली झालेल्‍या सर्वपक्षीय बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी परिस्थिती हाताळण्‍यासाठी सरकार आणि सैन्‍यदलाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधानांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या बैठकीत पाकमधील पीएमएल (एन) प्रमुख नवाज शरीफ, पीएमएल (क्यू) अध्यक्ष चौधरी शुजात हुसैन, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख काजी हुसैन अहमद आणि तहरीक-ए-इंसाफचे प्रमुख इमरान खानसह देशातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.