शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पॅरिस , शनिवार, 11 एप्रिल 2015 (11:46 IST)

भारताला फ्रान्सकडून ‘ताकद’

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ३६राफेल ही लढाऊ जेट विमाने फ्रान्सकडून खरेदी करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले.
 
फ्रान्सकडून १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा १२ अब्ज डॉलरचा करार गेली तीन वर्षे रेंगाळला असून, विमानाच्या किमतीवरून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मोदींच्या या दौºयावेळी या कराराबाबत निश्चित मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार, भारताने फ्रान्सकडे उड्डाणास तयार स्थितीतील 36 "राफेलह्य विमाने लवकरात लवकर देण्याची विनंती केली. मोदी आणि ओलॉंद यांनी चर्चेदरम्यान संरक्षण, अणू, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.