शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

भारताला सहकार्य करा- अमेरिका

अमेरिकेचा पाकला इशारा

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर आता अमेरिकेनेही या प्रश्नी पाकला फटकारले असून, भारत सरकारला या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करण्याची सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडालिजा राईस यांनी पाक सरकारला केल्या आहेत.

मुंबईतील ताज, हॉटेल ओबेरॉय, आणि नरिमन हाऊसवर झालेल्या हल्ल्यांनंतर मारले गेलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी या प्रकरणात पाकचे नाव घेतल्यानंतर आज अमेरिकेने पाक सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.